शिक्षकांनी परत केली सेवाशुल्काची रक्कम
By Admin | Updated: July 27, 2014 23:31 IST2014-07-27T23:31:36+5:302014-07-27T23:31:36+5:30
शासनाच्या आम आदमी विमा योजनेत शाळांकडून सेवामूल्याच्या नावावर दुप्पट रक्कम घेतली जात असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम परत केली.

शिक्षकांनी परत केली सेवाशुल्काची रक्कम
चांदूरबाजार : शासनाच्या आम आदमी विमा योजनेत शाळांकडून सेवामूल्याच्या नावावर दुप्पट रक्कम घेतली जात असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम परत केली.
इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे सुरु केलेली आम आदमी विमा योजनेव्दारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे कोणतीही जमीन नाही अथवा बागायती १ हेक्टर अथवा कोरडवाहू २ हेक्टरच्या आत शेतजमीन आहे. अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात येतो. परंतु तालुक्यातील काही शाळांमध्ये या योजनेचे दुप्पट शुल्क घेऊन पिळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. परंतु स्थानिक सेतू केंद्रावरच या योजनेसाठी लागणारे २२ रुपयांच्या जागी ३० ते ३५ रुपये आकारत आहे. हा प्रकार शासनाच्या योजनेपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून दुप्पट पैसे घेत असल्याची बाब उघड होताच काही शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पैसे परत करुन दिले. काही शिक्षकांनी या योजनेतून आपले अंग काढत या योजनेत विद्यार्थ्यांना मदत न करण्याचे ठरविले. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना आता स्वत:लाच त्रास घ्यावा लागत असल्याने अनेक विद्यार्थी या योजनेपासून दूरच राहाणार आहे. मात्र या योजनेत शिक्षकांंचा सहभागाविषयी गटशिक्षणाधिकारी ईर्शादउल्ला खान यांना विचारणा केली असता या योजनेत सर्वात मोठा सहभाग व शिक्षकांचाच महत्त्वाचा असून त्यांनी या योजनेत लाभार्थी विद्यार्थ्यांना पूर्ण सहयोग करणे तसेच या योजनेतील त्रुटींची पूर्णत: करणे हे शिक्षकांचे काम आहे. परंतु काही शिक्षक या योजनेतून आपल्या मुख्याध्यापकाला जबाबदार धरत आहे. (शहर प्रतिनिधी)