१० लाख ८२ हजार रुग्णांसाठी ‘ती’ रुग्णवाहिका ठरली देवदूत
By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:38:27+5:302014-06-29T00:38:27+5:30
राज्य सरकारने सुरु केलेली १०८ दूरध्वनी क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा राज्यातील १० लाख ४१ हजार रुग्णांसाठी देवदूत ठरली आहे. मागील सहा महिन्यांत या रुग्णांपैकी ३६ हजार १३२ रुग्णांना आपत्कालिन मदत

१० लाख ८२ हजार रुग्णांसाठी ‘ती’ रुग्णवाहिका ठरली देवदूत
वैभव बाबरेकर - अमरावती
राज्य सरकारने सुरु केलेली १०८ दूरध्वनी क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा राज्यातील १० लाख ४१ हजार रुग्णांसाठी देवदूत ठरली आहे. मागील सहा महिन्यांत या रुग्णांपैकी ३६ हजार १३२ रुग्णांना आपत्कालिन मदत मिळाली आहे.
महाराष्ट्र इमर्जंसी मेडिकल सर्व्हिसच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका पुरविण्यात आली १०८ दूरध्वनी क्रमांक डायल केल्यानंतर वैद्यकीय सेवेने सुसज्ज अशी रुग्णवाहिका नागरिकांच्या मदतीला येत असल्यामुळे रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळत आहे. २६ जानेवारी रोजी सुरु झालेल्या या आपत्कालिन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीकडे असून रुग्णालयात या सेवेचे प्रमुख केन्द्र व रिस्पॉन्स सेन्टर आहे. मागील सहा महिन्यात १० लाख ४१ हजार २ रुग्णांपैकी ४८५ रुग्णांकडून आभार प्रदर्शित करण्याचे कॉल कंपनीकडे आले आहेत. राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातात ६ हजार १९६ रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे मदत देण्यात आली. तसेच हृदयविकाराचे ३८६ रुग्ण व ८ हजार महिलांच्या प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेतून वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. या व्यतिरिक्त २० हजार ७५४ जणांनी तातडीने मदत मागविली.
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा या ७८८ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून राज्यभरात वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली आहे, अशी माहिती बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष एच.आर. गायकवाड यांनी दिली.