शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

उन्हाळ्यातही ‘अमदाबाद’ हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:36 AM

वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देतिवसा तालुक्यात एकमेव गाव : उर्ध्व वर्धाच्या मुख्य कालव्याने वाढला भूजलस्तर

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कितीही पाणीटंचाई असली तरी येथील नागरिकांना त्याची झळ पोहचत नाही.तालुक्यात अमदाबाद गाव केवळ २० घरांच्या वस्तीचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम दीडशेच्या घरात आहे. पालवाडी, भाम्बोरा, अमदाबाद अशा तीन गावांमिळून पालवाडी नावाने गटग्रामपंचायत आहे. गावात जाताना खडतर रस्त्यातून वाट काढावी लागते. गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, गावात भरपूर पाणी असल्याने प्रत्येकाच्या शेतात सिंचनाची सोय आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शेतकरी संपन्न आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना गावात सर्वत्र हिरवळ दिसून येते. येथील मुख्य पीक संत्र्याचे असून, सोबतच भाजीपाला व पारंपरिक उत्पन्न घेत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. गावाच्या दक्षिणेकडून काही अंतरावर अप्पर वर्धा धरणाचा मुख्य कालवा गेलेला आहे. त्यामुळे येथील जलस्त्रोत वाढलेला आहे. गावात बाराही महिने पाणी आहे. त्यामुळे येथील जमीन सुपीक असून भरीव उत्पादन शेतीतून घेतले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी सर्वत्र कल्लोळ माजला असताना या गावात सर्वत्र हिरवळीचे वातावरण आहे. या गावातील नागरिक खरोखरच भाग्यवान समजल्या जात आहे.कवडाची महाराज नागरिकांचे श्रद्धास्थानगावाचे ग्रामदैवत कवडाजी महाराज असून येथे सर्व गावकरी मिळून मोठा सप्ताह थाटात साजरा करतात. गावकरी मोठ्या आस्थेने सहभागी होऊन याला सहकार्य करतात. लगतच्या खेड्यातून नागरिक येथे महाप्रसादाकरिता येतात. त्यामुळे आगळेवेगळे महत्त्व सांगायला गावकरी विसरत नाही.शेतकऱ्याच्या शेतातून गावाला पाणीपुरवठाअमदाबाद गाव पालवाडी गट ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने गावात घरगुती नळ योजना नसली तरी गावातीलच एका शेतकºयाने आपल्या मालकीच्या विहिरीतून नळ कनेक्शन गावकऱ्यांना दिले आहे. गावातील सर्व विहीर व बोअरवेलला भर उन्हाळ्यातही मोठा जलसाठा असल्याने गावकरी समाधानी आहे.