माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाला १० मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST2021-03-05T04:14:00+5:302021-03-05T04:14:00+5:30
अमरावती : कोेरोना संसर्गामुळे परीक्षा ‘पोस्टपाेन’ झाल्या आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आले नाही. त्यामुळे हिवाळी २०२०, ...

माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाला १० मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ
अमरावती : कोेरोना संसर्गामुळे परीक्षा ‘पोस्टपाेन’ झाल्या आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आले नाही. त्यामुळे हिवाळी २०२०, वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांना आता ८ ते १० मार्च या कालावधीत महाविद्यालयात परीक्षा आवेदनपत्र सादर करता येणार आहे. परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नयेल यासाठी विद्यापीठाने पुन्हा परीक्षा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
विद्यापीठाने २ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक १६/२०२१ नुसार वार्षिक व सत्र पद्धती अभ्ळासक्रमांच्या ऑनलाईन परीक्षा वगळून उर्वरित सर्व माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्रे ऑफलाईननुसार आवश्यक शुल्क, विलंब शुल्कासह २२ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले जाणार होते. मात्र, माजी विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव विहीत मुदतीत परीक्षा आवेदनपत्रे महाविद्यालयात सादर केले नाही. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे कोणतेही विलंब शुल्क न आकारता ८ ते १० मार्च या कालावधीत माजी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करावे लागणार आहे. परीक्षा अर्ज सादरीकरणास मुदतवाढीची ही शेवटची संधी असणार आहे.
--------------
यांनाही सादर करता येईल परीक्षा अर्ज
विद्यापीठाने ११ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या अधिसूचना क्रमांक १८/२०२१ नुसार बी.ए, बी.पीए, बी. कॉम, बी.बी.ए, एम.ए, एम.कॉम. या परीक्षांच्या वार्षिक पद्धती अभ्यासक्रमांच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अधिकची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, या विद्यार्थ्याचे सुद्धा परीक्षा आवेदन पत्रे स्वीकारले जातील, असे स्पष्टकरण्यात आले आहे.
-------------
माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्रे ही महाविद्यालयात स्वीकारले जातील. विद्यापीठात अथवा पोस्टाने परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाही. महाविद्यालयांना परीक्षा शुल्कासह प्रती विद्यार्थी ४० रूपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ, विद्यापीठ.
------------------