शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

आलोडा ग्रामपंचायत सरपंच ठरले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

बेनोडा (शहीद):- नजीकच्या आलोडा ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश माधवराव निकम यांच्या वडिलांनी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत संयुक्त ...

बेनोडा (शहीद):- नजीकच्या आलोडा ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश माधवराव निकम यांच्या वडिलांनी सरकारी जागेवर केलेल्या अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत संयुक्त कुटुंबातील सदस्य या नात्याने नीलेश निकम यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरवीत असल्याचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.

आँक्टोबर २०१७ च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत नीलेश माधवराव निकम हे आलोडा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडणूक जिंकले. त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणारे मनोहर परशराम दाभाडे यांनी सरपंचांचे वडील माधव गणपत निकम यांनी सार्वजनिक जागी अतिक्रमण केल्याचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार या दोन्ही बाजूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपापल्या वकीलांच्या माध्यमातून अतिक्रमण प्रकरणाची माहिती सादर केली असता, दोन्ही पक्षाचे म्हणने ऐकल्यावर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात अतिक्रमण करून त्यावर ताबा मिळविल्याचा ठपका ठेवत ते अतिक्रमण नियमानुकूल केल्याचे कोणतेही दस्तावेज गैरअर्जदार सादर करू न शकल्याने अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. सरपंच नीलेश निकम यांना आलोडामधील ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-३) नुसार अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश कार्यालयाने १९ जानेवारीला पारित करण्यात आला. अर्जदार मनोहर दाभाडे यांच्यावतीने वकील गिरीश धर्माळे यांनी युक्तिवाद केला.