शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर एकाच कुटुंबाचा कब्जा; सून सरपंच, तर सासू सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 07:58 IST

गटग्रामपंचायतीमध्ये थेट निवडणूक असलेल्या सरपंचासह सदस्यांच्या सात जागांवर एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडून आल्याचा विक्रमच घडला आहे.

नरेंद्र जावरे, लोकमत न्यूज नेटवर्क

चिखलदरा (अमरावती) : ग्रामपंचायत निवडणुकीने अनेक प्रस्थापितांना धक्के दिले. अनेक नात्यांना गोत्यात आणले. परंतु, चिखलदरा तालुक्यातील आकी गटग्रामपंचायतीमध्ये थेट निवडणूक असलेल्या सरपंचासह सदस्यांच्या सात जागांवर एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडून आल्याचा विक्रमच घडला आहे. 

चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत आकी व चौऱ्यामल या दोन गावांसाठी ग्रामपंचायत आहे. १,२०५ लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावांमध्ये ६०० हून अधिक मतदार आहेत. नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक आटोपली. या ग्रामपंचायतीमध्ये सात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच अशा आठ जागांवर जावरकर कुटुंबातील पाच सदस्य निवडून आले. दोन जागांवर दोन सदस्य निवडून आल्याने शुक्रवारी त्यांनी नियमानुसार राजीनामादिला. माजी पोलिस पाटील बाबू जावरकर यांचे कुटुंब या विजयाने चर्चेत आले आहे. 

हे आहेत ग्रामपंचायत सदस्य

सरपंचपदावर सून इंद्रायणी राजेश जावरकर, सदस्यपदासाठी मुलगा माजी सरपंच राजेश जावरकर, पत्नी रुखमा बाबू जावरकर, बहीण बांदाय मावसकर, भाचा रामलाल जांभेकर, नात मीना सेलेकर हे सात जागांवर पाच सदस्य निवडून आले आहेत. 

दोन वाॅर्डांतून विजय अन् राजीनामा

जावरकर कुटुंबाने सात सदस्यपदांच्या जागेसाठी पाच सदस्य उभे केले होते. मुलगा राजेश जावरकर व नात मीना सेलेकर हे सदस्य दोन जागांवरून निवडून आल्याने प्रत्येकी एका जागेचा राजीनामा त्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात दिला. रिक्त जागेवर नियमाने सहा महिन्यांच्या आत निवडणूक लागेल. 

पंधरा वर्षांपासून सरपंच घरातच

- मोरगड ग्रामपंचायतीमधून २०१७ साली आकी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. - प्रथम सरपंच राजेश जावरकर असले तरी मोरगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच व सरपंचपदावर बाबू जावरकर यांची पत्नी रुखमा जावरकर होत्या. - त्यामुळे मागील पंधरा वर्षांपासून पद घरातच आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीChikhaldaraचिखलदरा