शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:05 PM2019-02-12T22:05:23+5:302019-02-12T22:06:12+5:30

जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

All-round support agenda for the farmers | शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्थानिक प्राधान्यानुसार व्हिजन, माध्यमांना ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूून शैलेश नवाल यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नवाल म्हणाले, लोकशाहीत लोकांनी मत मांडणे महत्त्वाचे आहे. ज्या समस्येचा तोडगा माझ्या अधिनस्थ विभागाकडून निघणार असेल, तो तातडीने निकाली काढण्यावर भर देणार आहोत. काही प्रश्न हे शासनस्तरावरचे असतात. त्याचाही आपण पाठपुरावा करू. जिल्हा संवेदनशील असल्याने स्थानिक समस्यांचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी वॉर रूम सुरू करणार आहे. त्या माध्यमातून अधिकाधिक समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे नवाल म्हणाले
मेळघाटातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात नुकताच शासननिर्णय निघाला. यावर जिल्हास्तरावर तोडगा काढण्यात येईल. आरोग्यसेवेच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सद्यस्थितीत याद्या तयार होत आहेत. योजनेत शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
२०१० तुकडीचे अधिकारी
मूळचे राजस्थान येथील शैलेश नवाल यापूर्वी वर्धा तेथे जिल्हाधिकारी होते. ते २०१० च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून २०१४ पर्यंत कार्य केले. त्यानंतर अहमदनगरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हनून काम पाहिले. ते दिल्ली स्कुल आॅफ इकानॉमिक्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी एम.ए. अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी आॅनलाइन सेवा देण्यावर भर दिला.

Web Title: All-round support agenda for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.