अडीच लाखांची गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:15+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरखेड ते चिरोडी मार्गावरून हातभट्टीच्या दारूची खेप पकडण्यात आली. याप्रकरणी दीपक प्रीतम साहू (२८), देवा संदीप साहू (रा. अमरावती) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. एम.एच. २७ एई ७३०० क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.

Alcohol seized in two and a half lakhs | अडीच लाखांची गावठी दारू जप्त

अडीच लाखांची गावठी दारू जप्त

ठळक मुद्देसात आरोपींविरुद्ध गुन्हे : मोर्शी, चांदूर रेल्वे एक्साईजची कारवाई, तीन दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या 'लॉकडाऊन' व संचारबंदीच्या काळात अवैध गावठी दारूविक्रीला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी विविध ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात तीन दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले गेले. मोर्शी, चांदूर रेल्वे एक्साइजने ही संयुक्त कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरखेड ते चिरोडी मार्गावरून हातभट्टीच्या दारूची खेप पकडण्यात आली. याप्रकरणी दीपक प्रीतम साहू (२८), देवा संदीप साहू (रा. अमरावती) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. एम.एच. २७ एई ७३०० क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड ते बासलापूर मार्गावर एमएच २७ सीएम ६७९५ क्रमांकाच्या दुचाकीने हातभट्टीची दारू वाहून नेताना मनोज दिलीप आठवले आणि अमोल देवमन वर्धे (रा. अमरावती) यांना पकडण्यात आले. मांजरखेड ते चांदूर रेल्वे मार्गावरून विजय पांडुरंग मदने (३१), कुणाल प्रल्हाद सारसर (रा. अमरावती) यांना मद्यासह जेरबंद करून गुन्हे नोंदविले. एमएच २७ एपी १०८ क्रमांकाची दुचाकी एक्साइजने जप्त केली.
एका घटनेत सुनील रामराव बावनथळे याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मंगरूळ पोलीस ठाणे अंतर्गत चिंचोली शिवारात हातभट्टीची दारू गाळण्याचे साहित्य, तीन दुचाकी ९५ लिटर दारू, २८७० किलो मोहा रसायन व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही कारवाई एक्साइजचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात मोर्शीचे निरीक्षक के.जी. आखरे, चांदूर रेल्वेचे दुय्यम निरीक्षक मोहन पाटील, रवि राऊतकर, प्रफुल्ल भोरे, बजरंग थोरात आदींनी केली. सद्यस्थितीत लॉकडाऊन व संचारबंदी दरम्यान दारू विक्रीची दुकाने बंद असल्याने हातभट्टीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
 

 

Web Title: Alcohol seized in two and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.