शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

‘प्रहार’च्या माजी जिल्हाध्यक्षांवर अकोटात गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 11:17 PM

पोलीस वसाहतीत घडला थरार: हल्लेखोरांनी झाडल्या दोन गोळ्या

अकोट(अकोला): प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजूकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गोळीबार केला. यामध्ये पुंडकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे अकोट शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी रात्री १० वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुंडकर यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. याप्रकरणी अकोट शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. फोटो आहे

टॅग्स :AmravatiअमरावतीakotअकोटFiringगोळीबार