धानोरा कोकाटे येथे कृषी संजीवनी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST2021-06-26T04:10:08+5:302021-06-26T04:10:08+5:30
अमरावती : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत धानोरा कोकाटे येथे कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात सभा पार पडली. शेतकऱ्यांना बीबीएफ ...

धानोरा कोकाटे येथे कृषी संजीवनी सप्ताह
अमरावती : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत धानोरा कोकाटे येथे कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात सभा पार पडली. शेतकऱ्यांना बीबीएफ रुंद वरंबा-सरी व पट्टा पेरणीबाबत तसेच बीज प्रक्रियेचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटविण्यात आले. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची विधी व त्याचा होणारा उपयोग समजावून सांगण्यात आले. गावातच उपलब्ध निंबोळ्या जमा कराव्या, जेणेकरून कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी करू शकू. त्याचबरोबर जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर आणि १० टक्के युरियाचा कमी वापर याबाबत माहिती मंडळ कृषी अधिकारी दीपक वानखडे, कृषी पर्यवेक्षक राजेंद्र धर्माळे, कृषिसहायक दीप्ती मेतकर यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रकाश कोकाटे, लीलाधर कोकाटे, प्रशांत काजळीकर, विजय गावंडे, गोवर्धन काेकाटे, भूषण चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.