अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घ्या; आंदोलनकर्त्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 12:41 IST2022-04-25T12:25:24+5:302022-04-25T12:41:06+5:30

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी

agitation of NCP, NSUI and Prahar Sanghatana at Amravati University for online summer examination | अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घ्या; आंदोलनकर्त्यांचा ठिय्या

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घ्या; आंदोलनकर्त्यांचा ठिय्या

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करीत अमरावती विद्यापीठासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, NSUI, युवासेना व प्रहार संघटनेचे वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

उन्हाळी परीक्षांबाबद विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम व भीतीचे वातावरण आहे, असा आरोप करत अमरावती विद्यापीठाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले. 

नागपूर विद्यापीठाची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येत आहे, मात्र यात अमरावती विद्यापीठ मध्ये वेगळा न्याय का असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. एसटी बस सुरवातीला बंद असल्याने विद्यार्थीना महाविद्यालयात जाता आलं नाही. त्यामुळे वर्गात काय शिकवलं हे विद्यार्थीना माहिती नाही त्यामुळे विद्यार्थी हिताचा निर्णय अमरावती विद्यापीठाणे घ्यावा व आगामी होणाऱ्या विद्यापिठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली. यावेळी विद्यापिठाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यात. यावेळी विद्यापिठात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला

Web Title: agitation of NCP, NSUI and Prahar Sanghatana at Amravati University for online summer examination