आंदोलनाने हादरले शहर
By Admin | Updated: August 2, 2014 23:51 IST2014-08-02T23:51:55+5:302014-08-02T23:51:55+5:30
मेंढपाळ धनगर समाजाचा शासन व प्रशासन स्तरावरील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शनिवारी मेंढपाळ धनगर विकास मंचच्यावतीने सायन्सकोर मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर राहुटी

आंदोलनाने हादरले शहर
धनगर समाजाचा आक्रोष : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, आरक्षणाची मागणी
अमरावती : मेंढपाळ धनगर समाजाचा शासन व प्रशासन स्तरावरील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शनिवारी मेंढपाळ धनगर विकास मंचच्यावतीने सायन्सकोर मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर राहुटी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्यात आले.
विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचप्रमुख मागण्यांमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) मध्ये तत्काळ समावेश करून अंमलबजावणी करावी, मेंढी चराईकरिता राखीव जंगल ठेवण्यात यावे, पारंपरिक वन निवासी असल्यामुळे वनहक्क चराई व चूल पास मिळावी, वन विभागाकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ थांबवावा, आदी मागण्या यावेळी धनगर विकास मंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी धनगर विकास मंचचे प्रमुख संतोष महात्मे, डॉ. वसंत लवणकर, अशोक गंधे, उमेश घुरडे, हरिभाऊ शिंदे, श्याम बोबडे, डॉ. विक्रांत गंधे, जानराव कोकरे, लक्ष्मण खाडे, सुभाष गोहत्रे, राजीव गंधे, भैयासाहेब किनकर, आचल कोल्हे, अवकाश बोरसे, शेखर शिंदे, शरद शिंदे, बंडू सूळ, संजय सूळ, वामन शिंदे, शाम घुरडे, नीलेश मातकर, प्रदीप अलोणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)