पुन्हा नऊ, कोरोना @२१२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:30+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे एकाच कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धासह ५४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Again nine, Corona @ 212 | पुन्हा नऊ, कोरोना @२१२

पुन्हा नऊ, कोरोना @२१२

Next
ठळक मुद्देअंबागेट भागात संक्रमण रतनगंज, फ्रेजरपुरातही वाढताहेत कोरोनाग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचे संक्रमण रोज नव्या भागात होत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत नऊ पॉझिटिव्हची नोंद झाली. अंबागेट या नव्या भागात कोरोनाग्रस्ताचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१२ वर पोहोचली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज येथे एकाच कुटुंबातील ८० वर्षीय वृद्धासह ५४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळी फ्रेजरपुरा येथीलच २२ व २८ वर्षीय तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
फ्रेजरपुऱ्यात शनिवारी चार कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. या भागात आता रुग्णसंख्या आठ झाली आहे. येथे अवैध धंद्यांमुळे वर्दळ असल्याची काही तक्रारी प्रशासनाकडे गेल्या आहेत. त्यादृष्टीने कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी सांगितले. मसानगंज या कंटेनमेंटमध्ये लवकरच नियंत्रण मिळविले जाईल. या ठिकाणी आता नागरिक स्वत:हून समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील कंटेनमेंटमध्ये नव्याने रुग्ण नाहीत. त्यामुळे शिराळा, परसापूर व कांडली हे कंटेनमेंट दोन दिवसांत निरस्त होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. अन्य जिल्हे व राज्यातून अनेक जण येत आहेत. गृह विलगीकरणात लहान घरांमुळे अडचण आल्यास तसे कळवावे. जिल्ह्यात उपलब्ध विलगीकरण कक्षात ते राहू शकतात, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

चार जण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’
पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतरच्या दहा दिवसांत लक्षणे नसल्यामुळे शनिवारी चार महिला रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये हबीबनगरातील ४२ वर्षीय, वलगाव रोडवरील ३९ वर्षीय, हनुमाननगरातील ३८ वर्षीय तसेच लालखडी येथील २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शासनाच्या गाइड लाइननुसार पॉझिटिव्ह रुग्णाला दाखल झाल्याच्या पहिल्या पाच दिवसांत औषधाचा कोर्स दिला जातो व नंतरचे पाच दिवस निरीक्षण केले जाते. कुठलीही लक्षणे नसल्यास रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: Again nine, Corona @ 212

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.