शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे रेल्वे इंजिन वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:17 IST

Amravati : आरोप; पर्यटनस्थळाची दुरवस्था; अमरावतीचा विकास खुंटला

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज ठाकरे यांनी बुधवारी येथील सायन्स स्कोर मैदानावर 'राजगर्जना' सभेतून देश, राज्याच्या राजकारणावर सडकून टीका केली. अमरावतीशी त्यांचा स्नेह आणि जिव्हाळादेखील त्यांनी मांडला. आमदार आज येथे, उद्या तिथे यावरही प्रकाश टाकला.

सरकार कधी, कुणाचे? कोण कोणत्या पक्षात याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. आमदार फुटले, खोके घेतले हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या समस्या, प्रश्नांना त्यांनी उजाळा दिला. काहीही असू द्या राज ठाकरे यांचे काही मुद्दे हे नागरिकांच्या मनाला स्पर्शन गेले. म्हणूनच राज ठाकरे यांच्या सभेनंतर अमरावतीत मनसेचे रेल्वे इंजिन वेगात धावेल, अशा बोलक्या प्रतिक्रिया नागरिकांच्या उमटल्या. राज ठाकरे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट थेट जनतेसमोर सादर करणारा नेता राज ठाकरे हे एकमात्र आहेत. बुधवारच्या सभेतही त्यांनी अमरावतीच्या ओबडधोबड विकासावर बोट ठेवले. एकदा संधी द्या विकास काय असतो, हे दाखवून देईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी दर्शविला. मनसेचे आमदार हे जनतेसोबत मतदार संघात राहतील. ईतर पक्षाचे आमदार पुणे, मुंबईत स्थायिक होतात, तसे अमरावतीत होणार नाही, अशी ग्वाही देण्यास ते विसरले नाहीत. अमरावतीचे युवक युवती रोजगारासाठी पुणे, मुंबईकडे जात असल्याबाबत चिंता व्यक्त करताना राज ठाकरे यांनी लोकप्रतिधींना जबाबदार धरले. त्यामुळे मतदारांनो, हेवा वाटणारा महाराष्ट्र घडविण्यासाठी मनसेला संधी द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केली. 

राजकमल चौकात पाकिस्तानचे झेंडे कसे? : पप्पू पाटील अमरावती मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार मंगेश उर्फ पप्पू पाटील यांनी बुधवारी जाहीर सभेत मनोगत व्यक्त करताना राजकमल चौकात पाकिस्तानचे झेंडे आणि पिवळी माती उधळली जाते? हा सर्व प्रकार होत असताना कोणीच काही बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली. विशिष्ट समुदायाचा मोर्चा काढला जातो. दंगली घडविल्या जातात. मात्र या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला तर मनसेवर कारवाई करण्यात येते. अमरावती शहराच्या शाश्वत विकासावर आजी- माजी आमदार बोलत नाही. परंतु येत्या ५ ते ६ महिन्यात अमरावतीत आयटी पार्क आणणार, असा विश्वास पप्पू पाटील यांनी दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmravatiअमरावती