कुटुंब नियोजनानंतर महिलेची प्रकृती बिघडली

By Admin | Updated: April 11, 2015 00:12 IST2015-04-11T00:12:40+5:302015-04-11T00:12:40+5:30

लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने ...

After family planning, the condition of the woman has worsened | कुटुंब नियोजनानंतर महिलेची प्रकृती बिघडली

कुटुंब नियोजनानंतर महिलेची प्रकृती बिघडली

मध्यरात्रीनंतर इर्विनमध्ये उपचार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
अमरावती : लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला गुरुवारी मध्यरात्री इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्गाची प्रकृती बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने गोंधळ उडाला होता.
लोणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दुर्गा उमेश इंगोले (२३ रा.कोठोडा सार्सी) यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर अचानक दुर्गा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सायंकाळी इर्विनमध्ये दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे इर्विन प्रशासनाकडून सर्जनला बोलावणे आवश्यक होते. मात्र उशिरा कॉल झाल्याने महिलेची प्रकृती आणखी बिघडली होती. दरम्यान नातेवाईकांनी लोणी प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन इर्विनमध्ये संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. मात्र मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी अमित भस्मे यांनी रुग्णाची तपासणी करुन औषधोपचार सुरु केला. सद्यस्थितीत दुर्गा यांच्या प्रकृती सुधारणा झाली आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गुतांगुतीचे प्रक्रिया आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. दुर्गा इंगोले या महिलेला इर्विनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृतीत चागंली आहे.
- अमित भस्मे,
वैद्यकीय अधिकारी.

Web Title: After family planning, the condition of the woman has worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.