युवकाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे घटनास्थळ बदलविले
By Admin | Updated: October 5, 2015 00:36 IST2015-10-05T00:36:16+5:302015-10-05T00:36:16+5:30
विद्युत प्रवाहाने युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवल्याचा प्रकार मासोद येथील शेतशिवारात शुक्रवारी रात्री घडला.

युवकाच्या मृत्यूनंतर मृतदेहाचे घटनास्थळ बदलविले
घातपाताचा संशय : मासोद शेतशिवारातील घटना
अमरावती : विद्युत प्रवाहाने युवकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवल्याचा प्रकार मासोद येथील शेतशिवारात शुक्रवारी रात्री घडला. सागर विनोद काळभांडे (२३,रा.मासोद) असे मृताचे नाव असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
सागर हा शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाऊ गौरव याने फे्रजरपुरा ठाण्यात केली होती. मात्र, शनिवारी सकाळी मासोद येथील एका पडीक शेतशिवारात सागर काळबांडेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. वन्यप्राण्यापासून शेतमालाचा बचाव करण्याकरिता शेतात तारेचे कुंपण लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. त्या तारेच्या कुंपणात पाय अडकल्याने सागरला विद्युत प्रवाहाचा झटका बसला व त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. मात्र, ज्या ठिकाणच्या कुपंणाला सागरचा स्पर्श झाला. तेथून ५० मिटर अंतरावर सागरचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी पंचनामा केला असता सागरचा मृतदेह काळा पडल्याचे दिसून आले. त्यांचे पाय व हात भाजल्याचे आढळून आले आहेत. अधिक तपास सुरू आहे.
सागरचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता घटनास्थळावरून मृतदेह हलविल्याचे आढळून येत आहे. त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे.
- जी.जी.सोळंके,
पोलीस निरीक्षक,
फे्रजरपुरा पोलीस ठाणे.