अखेर केबल प्रक्षेपण सुरू

By Admin | Updated: January 5, 2016 00:04 IST2016-01-05T00:04:35+5:302016-01-05T00:04:35+5:30

तिसऱ्या टप्यातील डिजीटायझेशन प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने उच्च न्यायालयाने अखेर सहा आठवड्यासाठी डिजीटायजेशनला स्थगिती दिली आहे.

After all, the cable launch started | अखेर केबल प्रक्षेपण सुरू

अखेर केबल प्रक्षेपण सुरू

अमरावती : तिसऱ्या टप्यातील डिजीटायझेशन प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने उच्च न्यायालयाने अखेर सहा आठवड्यासाठी डिजीटायजेशनला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे सेटटॉप बॉक्सविना केबल प्रक्षेपण दिसणार आहे.
३१ डिसेंबर उलटून गेल्यानंतरही सेटटॉप बॉक्स लावण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे न गेल्याने मुदतवाढ मिळावी यासाठी नाशिक केबल असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन शासन निर्णयाला आव्हान दिले होते.
‘त्या’ दोन
राज्यांचा संदर्भ
अमरावती : तेलगंण आणि सिक्कीम राज्याने केद्रांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्याचे त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देतानाच हा निर्णय महाराष्ट्राला लागू आहे की नाही. याबाबतचा खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यावर निर्णय देत राज्यात सेटटॉप बॉक्स उपलब्ध नसल्याने डिजीटायझेशनला सहा आठवड्याची स्थगिती दिली. सेटटॉप बसविणे केबल धारकांना अनिवार्य असून पुढील सुनावणीपर्यंत अ‍ॅनालॉग प्रक्षेपण केबल जोडणीधारकांना पाहता येणार आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी खुशाल परदेशी यांनी दुजोरा दिला आहे.

Web Title: After all, the cable launch started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.