शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

-आता आदिवासींच्या विकासासाठी उपयोजना

By admin | Updated: October 9, 2015 00:54 IST

राज्य शासन आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते.

शासन निर्णय : सन २०१६-१७ साठी कालबध्द कार्यक्रम जाहीरगणेश वासनिक अमरावतीराज्य शासन आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, या योजना आदिवासींपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता शासनाने जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षांपासून केली जाणार आहे.राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. परंतु अनुदानाच्या तुलनेत आदिवासी समाजापर्यंत योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे योजनांचा लाभ मिळत नाही. ही दरी कमी करण्याच्या अनुषंगाने आदिवासी उपयोजना तयार करून ती जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी पाठविणे अनिवार्य केले आहे. आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु.ना.शिंदे यांनी शासन निर्णय निर्गमित करून सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी उपयोजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांना जिल्ह्याचा आराखडा तयार करताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. आदिवासी उपयोजना बाहेरील क्षेत्र जिल्ह्यांसाठी लागू करताना नियतव्ययाच्या अधीन राहून वार्षिक आराखडा तयार करावा लागणार आहे. या योजनांसाठी पुरेसा नियतव्यय राखीव ठेवावा तसेच लक्ष्यांक निश्चित करण्याची दक्षता घ्यावी लागणार आहे. शिक्षण, आरोग्य, जलसंधारणाची कामे, रस्ते विकास आदी कामे प्रस्तावित करताना अनुषंगिक बाबी विचारात घेऊन आदिवासी उपयोजना व सर्वसाधारण क्षेत्र योजना यात समाविष्ट विकासकामांचे नियोजन करावे लागणार आहे. आदिवासी क्षेत्राकरिता केलेली तरतूद आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेत खर्च करता येणार नाही, ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेतील विकासकामे ही प्रकल्प अधिकाऱ्यांनी दौरे करुन तसेच क्षेत्रीय पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आदिवासी समाजापर्यंत योजना पोहोचविणे अनिवार्य केले आहे. उपयोजनेत लहान गट, जिल्हा नियोजन समिती व राज्यतस्तरीय बैठकीत तयार करण्यात येणारा जिल्हा योजनेचा आरखडा कार्यान्वयीन यंत्रणांनी योजना माहिती प्रणालीमध्येच सादर करणे बंधनकारक राहील, असे शासन निर्देश आहेत.