२५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश

By Admin | Updated: October 5, 2015 00:33 IST2015-10-05T00:33:40+5:302015-10-05T00:33:40+5:30

आदिवासींना समाजाच्या ंमुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यातील २५ हजार ....

Admission to 25 thousand students enrolled school | २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश

२५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश

आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती : मोर्शी येथे आदिवासी उपविभागीय कार्यालयाची निर्मिती
अमरावती : आदिवासींना समाजाच्या ंमुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी रविवारी वरुड येथील कृषी व संत्रा महोत्सवात केली.
वरुड येथील कृषी व संत्रा महोत्सवात ते शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीश आत्राम, आ. अनिल बोंडे, आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्ष रवी थोरात, आदिवासी समाज कार्यकर्ते कृष्णराव चव्हाण, आदिवासी उपायुक्त श्री तायडे, प्रकल्प अधिकारी रमेश मवाशी, जि.प. सदस्य अर्चना मुरुमकर, वरुड व मोर्शी तालुक्यातील आदिवासी सरपंच, उपसरपंच नगर परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
ना.सावरा म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे दजेर्दार शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेऊन सनदी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावे. शैक्षणिकदृष्टया आदिवासी विद्यार्थी सक्षम होण्यासाठी वसतिगृहात विद्यार्थी क्षमता वाढविली आहे. आदिवासींच्या कल्याणार्थ आदिवासी विकास विभाग धारणी येथे कार्यान्वित आहे.
आदिवासी विकास विभागाव्दारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांंनी या योजनांची माहिती जाणून घ्यावात, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीश आत्राम यांनी केले.
प्रास्ताविक आ. बोंडे यांनी केले. ते म्हणाले, खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी मुला-मुलींचे नवीन वसतिगृह मोर्शी येथे उभारण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांना केली. खावटी कर्जाचा लाभ तसेच शबरी घरकूल योजनांचा लाभ एपीएल व बीपीएलधारक आदिवासी बांधवांना देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांना केली. कार्यकमाला मोर्शी -वरुड परिसरातील आदिवासी शेतकरी बांधव, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Admission to 25 thousand students enrolled school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.