शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड येथील अवैध बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ

By admin | Updated: March 14, 2015 00:39 IST

शासनाच्या जागे सोबतच शेजाऱ्याच्या खुल्या प्लॉटवर अवैधरीरत्या सुरु असलेले बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ ठरल्यामुळे शेवटी..

मोर्शी : शासनाच्या जागे सोबतच शेजाऱ्याच्या खुल्या प्लॉटवर अवैधरीरत्या सुरु असलेले बांधकाम थांबविण्यास प्रशासन असमर्थ ठरल्यामुळे शेवटी न्याय मागायचा कोणाकडे, हा प्रश्न हिवरखेड येथील महिलेसमोर उपस्थित झाला आहे.हिवरखेड येथील पंचफुलाबाई महादेवराव तंतरपाळे यांना घर बांधण्याकरिता महसूल विभागातर्फे रकमेचा भरणा करुन २००२ मध्ये खुला प्लॉट देण्यात आला होता. त्याच वेळेस अंबादास पंडागळे या लाभार्थ्यालासुध्दा पंचफुलाबाई यांच्या शेजारी असलेला प्लॉट देण्यात आलेला होता. मात्र पंडागळे यांनी शासकीय रकमेचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नायब तहसीलदार यांनी ८ जानेवारी २०१५ रोजी पत्र पाठवून त्यांचा या भूखंडावर कोणताही हक्क राहिला नसल्याचे कळविले आहे. पंडागळे यांनी मागील दोन महिन्यांपासून शासनाच्या या जागेवर अतिक्रमण करुन शिवाय शेजारच्या पंचफुलाबाई तंतरपाळे यांच्या ताब्यातील रिकाम्या जागेवरसुध्दा पक्के बांधकाम सुरु केले. पंचफुलाबाई यांनी पंडागळे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. ग्राम पंचायतीपासून तर आमदारांपर्यंत तक्रारी नोंदविल्या; मात्र पंडागळे यांचे बांधकाम मात्र कोणताही अधिकारी थांबवू शकला नाही. त्यामुळे कोणताही अधिकारी आपले बांधकाम थांबवूच शकत नसल्याची गर्वोक्ती सुध्दा पंडागळे करीत असल्याचा पंचफुलाबाई यांचा आरोप आहे. महसूल विभागाच्या प्लॉट वर अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी खऱ्या अर्थाने महसूल विभागाची आहे. तसेच तक्रारीनंतरही या बाबीकडे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय आणि चक्क दुसऱ्याच्या प्लॉटवर अतिक्रमण केले जात असताना मात्र ग्रामपंचायत प्रशासनसुध्दा मूग गिळून बसले असल्यामुळे, शेवटी याप्रकरणी न्याय मागायचा कोणाला, हा प्रश्न पंचफुलाबाई तंतरपाळे यांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)