बदलीविरुध्द आदिवासी अप्पर आयुक्त प्राधिकरणात

By Admin | Updated: May 30, 2015 00:26 IST2015-05-30T00:26:48+5:302015-05-30T00:26:48+5:30

येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केली.

Adhivasi Admn. Admitted to the Tribunal | बदलीविरुध्द आदिवासी अप्पर आयुक्त प्राधिकरणात

बदलीविरुध्द आदिवासी अप्पर आयुक्त प्राधिकरणात

स्थगनादेश मिळाला : आत्राम पुन्हा पदभार स्वीकारणार काय?
अमरावती : येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने गुरुवारी बदली केली. मात्र, आत्राम यांनी या बदलीविरुध्द प्रशासकीय लवादाकडे धाव घेत ‘स्टेटस्को’ मिळविला. परंतु गुरुवारी अमरावतीत प्राप्त झालेल्या आदेशानुसार आत्राम यांची एकतर्फी बदली करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना शुक्रवारी ‘स्टेटस्को’ मिळाला. त्यामुळे आता एटीसींच्या खुर्चीवरुन वाद रंगणार असे संकेत आहेत.
अशोक आत्राम यांची अमरावती एटीसीपदी प्रतिनियुक्ती वरील नियुक्ती प्रशासकीय कारणास्तव समाप्त करुन त्यांची सेवा ही सामान्य प्रशासन विभागास प्रत्यावर्तित करण्याचे आदेश दिले आहेत. पदाचा अतिरिक्त कारभार महादेव राघार्ते यांच्याकडे सोपविण्याचे कळविले होते. त्यानुसार एकतर्फी कारभार घेण्याची प्रक्रिया आदिवासी विकास विभागाने करुन तसा अहवाल शासनाला कळविला. परंतु १६ आॅगस्ट २०१४ रोजी कारभार स्वीकारणाऱ्या आत्राम यांना वर्षभराचा कालावधी झाला नसताना बदली करणे जिव्हारी लागले. परिणामी त्यांनी शुक्रवारी मॅटमध्ये धाव घेत बदलीसंदर्भात स्टेटस्को मिळविला. आत्राम यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. आदिवासी समाजाची व्यक्ती असताना त्याच समाजाच्या सर्वाधिक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, हे विशेष. प्रशासकीय कारणास्तव आत्राम यांची बदली करण्यास शासनास पुढाकार घ्यावा लागल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. शुक्रवारी स्टेटस्को मिळाल्याने आत्राम हे शनिवारी एटीसी कार्यालयात जावून खुर्चीवर बसतात काय? याकडे लक्ष लागले आहे. परंतु स्टेटस्को हा शुक्रवारी मिळाला. आत्राम यांच्या सीटीसीची प्रक्रिया गुरुवारी पार पडली. त्यामुळे शासन दरबारी आत्राम यांच्या बदलीसंदर्भाचा विषय प्रलंबित राहिला.

Web Title: Adhivasi Admn. Admitted to the Tribunal