पुनर्मूल्यांकनात गुणवाढप्रकरणी २५० परीक्षकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:46+5:30
सुमारे २५० परीक्षकांनी मूल्यांकनात त्रुटी, दोष ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. आता दोषी परीक्षकांची यादी तयार केली जात असून, कारवाईसाठी परीक्षा मंडळासमोर ही प्रकरणे ठेवली जातील. यात अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील परीक्षकांचा समावेश आहे.

पुनर्मूल्यांकनात गुणवाढप्रकरणी २५० परीक्षकांवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्क््यांपेक्षा जास्त गुणवाढप्रकरणी २५० परीक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. २५ हजार ७५० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन करून घेतले. १९ हजार ३३९ विद्यार्थ्यांना गुणवाढ मिळाली. एकंदर २५० परीक्षकांवर मूल्यांकनात दोष, त्रुटी ठेवल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची रक्कम परीक्षा मंडळ ठरविणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षकांनी मूल्यांकनात दोष, त्रुटी ठेवल्यास आणि पुनर्मूल्यांकनात २५ टक्क््यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्यास संबंधित परीक्षकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागाने उन्हाळी २०१९ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्क््यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्याच्या प्रकरणांची पडताळणी चालविली आहे. सुमारे २५० परीक्षकांनी मूल्यांकनात त्रुटी, दोष ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. आता दोषी परीक्षकांची यादी तयार केली जात असून, कारवाईसाठी परीक्षा मंडळासमोर ही प्रकरणे ठेवली जातील. यात अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील परीक्षकांचा समावेश आहे.
कारणे दाखवा नोटीस बजावल्या
मूल्यांकनात दोष, त्रुटी असल्याप्रकरणी २५० परीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत दोषी परीक्षकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. ही कारवाई विद्यापीठ नियमावली २३/७/ २०१५ नुसार करण्यात येणार आहे.
पुनर्मूल्यांकनात गुणवाढ प्रकरण हे उन्हाळी २०१९ परीक्षेचे आहे. आतापर्यंत २५० दोषी परीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मार्चमध्ये परीक्षा मंडळाची बैठक आहे. यात परीक्षकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय होईल.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ