'व्हॅलेंटाईन डे' दिनी एका प्रेमीयुगुलावर कारवाई, मंदिरातूनच जोडपं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 22:03 IST2021-02-14T22:03:05+5:302021-02-14T22:03:46+5:30

पोलिसांचा शहरात कडक बंदोबस्त, छत्री तलाव, शिवटेकडीवर तरुणाई फिरकलीच नाही

Action against a couple on 'Valentine's Day', couple arrested from temple premises | 'व्हॅलेंटाईन डे' दिनी एका प्रेमीयुगुलावर कारवाई, मंदिरातूनच जोडपं ताब्यात

'व्हॅलेंटाईन डे' दिनी एका प्रेमीयुगुलावर कारवाई, मंदिरातूनच जोडपं ताब्यात

ठळक मुद्देमंदिर परिसरात प्रेमीयुगुल चाळे करताना दामिनी पथकाला आढळून आले. त्यांच्यावर कलम ११० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले

अमरावती : शहर पोलिसांनी ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावून कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे छत्री तलाव, शिवटेकडी व विविध बगीच्यात तरुणाई रविवारी फिरकलीच नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तरूणाईने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत मात्र, एका प्रेमीयुगुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर प्रेमीयुगुलाला फ्रेजरपुरा ठाण्याच्या दामिनी पथकाने सोमेश्वर मंदिरातून ताब्यात घेतले. 

मंदिर परिसरात प्रेमीयुगुल चाळे करताना दामिनी पथकाला आढळून आले. त्यांच्यावर कलम ११० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले. छत्री तलाव, प्रशांतनगर बगिच्या, मालटेकडी, वडाळी तलाव परिसरात पोलिसांनी गस्त केली. मात्र, त्यांना प्रेमीयुगुल आढळून आले नाही. पोलिसांनी तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवरसुद्धा कारवाया केल्या. तसेच पाचपेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी वावरत असेल तर त्यांच्यावर भादंविचे कलम १८८ व अन्य कलमांतर्गत शहरात अनेक कारवाया करण्यात आल्या. मात्र, नेमक्या किती कारवाया झाल्या याची माहिती वृत्त लिहिस्तोेवर उपलब्ध होऊ शकली नाही. यासंदर्भात विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.
 

Web Title: Action against a couple on 'Valentine's Day', couple arrested from temple premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.