अनुपस्थित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:14+5:30

दिवाळी आटोपून आठवडा होत असताना अनेक कार्यालयांत शुकशुकाट आहे. अशात तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्या कारभाराबाबत जिल्हा परिषद मुख्यालयात तक्रारींचा ओघ वाढला. त्याची दखल घेत गोंडाणे यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा ते कार्यालयात उपस्थित नव्हते. याबाबत दैनंदिनीमध्ये नोंद नव्हती.

Action against an absent taluka medical officer | अनुपस्थित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई

अनुपस्थित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई

Next
ठळक मुद्देजि.प. अध्यक्षांची आकस्मिक भेट : बालकल्याण अधिकारीही लेटलतीफ

चांदूर रेल्वे : तालुका वैद्यकीय अधिकारी आणि महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याबाबत असलेली ओरड व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी मंगळवारी या दोन्ही कार्यालयांना आकस्मिक भेट दिली. त्यावेळी दोन्ही अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या कारवाई प्रस्तवित करण्यात आली.
दिवाळी आटोपून आठवडा होत असताना अनेक कार्यालयांत शुकशुकाट आहे. अशात तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्या कारभाराबाबत जिल्हा परिषद मुख्यालयात तक्रारींचा ओघ वाढला. त्याची दखल घेत गोंडाणे यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा ते कार्यालयात उपस्थित नव्हते. याबाबत दैनंदिनीमध्ये नोंद नव्हती. महिला व बाल कल्याण अधिकारी व्यवहारे यासुद्धा कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली. महिला व बाल कल्याणच्या कनिष्ठ सहायकावरही कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश अध्यक्ष गोंडाणे यांनी दिले. दोन्ही अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश आपण प्रशासनास दिल्याचे गोंडाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Action against an absent taluka medical officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.