अवैध रेती वाहतुकीच्या ११ ट्रकवर कारवाई

By Admin | Updated: April 11, 2015 00:17 IST2015-04-11T00:17:35+5:302015-04-11T00:17:35+5:30

तालुक्यात अवैध खनिज तसेच रेती वाहतुकीचा सुळसुळाट असल्याचे कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे..

Action on 11 trawlers of illegal sand transport | अवैध रेती वाहतुकीच्या ११ ट्रकवर कारवाई

अवैध रेती वाहतुकीच्या ११ ट्रकवर कारवाई

रेती तस्करांमध्ये खळबळ : चांदूर उपविभागाचे मात्र दुर्लक्ष
चांदूररेल्वे : तालुक्यात अवैध खनिज तसेच रेती वाहतुकीचा सुळसुळाट असल्याचे कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे. गुरुवारी अमरावती आरटीओने तब्बल १८ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कारवाई करीत ते चांदूररेल्वे स्टेशनला जमा केले. असे असताना चांदूररेल्वे उपविभागाचे मात्र या रेती वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याची चर्चा होत आहे.
एमएच २७ एक्स ४९६४, एमएच ३४ एएम ७७७३, पीजी १५ अ‍े ४५५६, एमएच २७ अ‍े ४४८४, एमएच ३१ पीबी १६४, एमएच २७ एक्स ४०२१, एमएच ०४ पीजी ७२३६, एमएच ३१ अ‍ेपी ४६१५, एमटीव्ही २८१३, एमडब्ल्यूवाय २६५७, एमएच २९-७९१३ असे कारवाई होत असलेल्या ट्रकांचे नंबर असून बाभुळगावहून येताना चांदूर-अमरावती बायपासवर अमरावती पोलिसांनी ही कारवाई केली. महिनाभरापासून तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे व त्यामुळे तालुक्यातील अनेक मोठे रस्ते खराबही होत आहेत. एवढेच नव्हे तर आ. जगताप यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला. परंतु चांदूर महसूल विभाग व पोलीस विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. अधून-मधून मोठी कारवाई करण्याचा आव पोलीस आणत असून प्रत्यक्षात कारवाई मात्र अत्यल्प असते, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

प्रत्येकी १२ हजारांचा दंड
श्पकडलेल्या रेती ट्रकांवर तहसील कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी १२ हजार ४०० इतका दंड आकारण्यात आला. त्यातील ३ ट्रकमालकांनी गुरुवारी दंड भरला असून इतर ट्रक मालकही दंड भरणार असल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांनी सांगितले.

पोलिसांच्या आपसी मतभेदामुळे सापडले ट्रक
रेती ट्रकमालक व पोलिसांचे साटेलोट असतात, ही बाब सर्वांनाच माहीत असली तरी पोलिसांच्या आपसी मतभेदामुळे गुरुवारी ट्रक पकडला गेल्याची चर्चा काही ट्रक चालक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळाली. रेती माफियांकडून मिळालेला हप्ता शेवटच्या पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचत नसल्याने नाराज पोलीस कर्मचारीच वरिष्ठांना माहिती पुरवून हे अवैध रेती ट्रक पकडून देतात, अशा चर्चेला परिसरात पेव फुटले आहे.

Web Title: Action on 11 trawlers of illegal sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.