देश-विदेशात जातो ‘अचलपुरी संत्रा’

By Admin | Updated: December 11, 2015 00:37 IST2015-12-11T00:37:50+5:302015-12-11T00:37:50+5:30

नागपूरची ओळख ठरणारा संत्रा आता अचलपूरमध्येही बाजारपेठ ठरूलागला आहे. विदेशात बंदी, केरळमध्ये रबर उत्पादनात ...

'Achalpuri Orange' goes abroad and abroad | देश-विदेशात जातो ‘अचलपुरी संत्रा’

देश-विदेशात जातो ‘अचलपुरी संत्रा’

पाच महिन्यांत सहा हजार मजुरांना रोजगार : बांग्लादेशात शासकीय तंत्रामुळे गेला नाही संत्रा
नरेंद्र जावरे परतवाडा
नागपूरची ओळख ठरणारा संत्रा आता अचलपूरमध्येही बाजारपेठ ठरूलागला आहे. विदेशात बंदी, केरळमध्ये रबर उत्पादनात आलेली मंदी आणि मोठ्या प्रमाणात झालेले उत्पन्न पाहता संत्र्याला हवे तसे भाव नसताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ४० संत्रा मंडईतून सहा हजारांवर मजुरांना सलग पाच महिने चांगल्या वेतनासह रोजगार मिळाला आहे.
अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आता संत्रा उत्पादन घेतले जात आहे. मागील दहा वर्षांत सर्वाधिक बंदी यावर्षी संत्रा उत्पादनावर आली आहे. अचलपूर-परतवाडा शहराच्या चारही बाजूने जलसिंचन प्रकल्प असल्याने पाण्याच्या बाबतीत श्रीमंत असा हा तालुका आहे. परिणामी संत्रा, केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते.
४० मंडई, सहा हजार मजूर
अचलपूर तालुक्यात जवळपास ४० संत्रामंडई या वर्षी लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी अंजनगाव, चिखलदरा, मल्हारा रस्त्यावर तब्बल २२ मंडई होत्या. या संत्रामंडईतूनच देश विदेशातील बाजारपेठेत संत्रा पोहोचविला जातो. हा संत्रा पोहोचविण्यासाठी जवळपास पाच महिने सहा हजारांवर अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती संत्रा उत्पादक राजेंद्र गोरले यांनी दिली. अचलपूर तालुक्यातील १७२ पैकी १६५ गावात संत्रा पीक घेतले जाते. त्यामध्ये मल्हारा, एकलासपूर, धामणगाव गढी, धोतरखेडा, गौलखेडा बाजार, हनवतखेडा, वडगंव फत्तेपूर, परसापूर, कविठा या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन घेतले जातात. कृषी विभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ६४,६३० हेक्टर एकूण अचलपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र आहे.

Web Title: 'Achalpuri Orange' goes abroad and abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.