अचलपूर, सरमसपुरा ठाणेदारांची उचलबांगडी

By Admin | Updated: August 17, 2015 00:02 IST2015-08-17T00:02:43+5:302015-08-17T00:02:43+5:30

स्वातंत्र्यदिनी अचलपूर-परतवाड्यातील दोन ठाणेदारांसह जिल्ह्यातील पाच ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

Achalpur, Sarsampura Thanedar's picking pimp | अचलपूर, सरमसपुरा ठाणेदारांची उचलबांगडी

अचलपूर, सरमसपुरा ठाणेदारांची उचलबांगडी

अमित बटाऊवाले हत्याकांड : आणखी दोन आरोपींना अटक
अमरावती/ अचलपूर : स्वातंत्र्यदिनी अचलपूर-परतवाड्यातील दोन ठाणेदारांसह जिल्ह्यातील पाच ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. वाळूमाफियांचा उच्छाद आणि अमित बटाऊवाले हत्याकांडाच्या पार्श्वभूमिवर तपासात अपयशी ठरलेल्या या ठाणेदारांची उचलबांगडी करण्यात आली. अचलपूरचे ठाणेदार चक्षुपाल बहादुरे यांना अमरावती ग्रामीण नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले आहे. त्यांच्याजागी खोलापूर येथील ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सरमसपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मडावी यांच्या जागी ठाणेदार मुकेश गावंडे यांची नेमणूक केली गेली आहे.
‘लोकमत’ने अमित बटाऊवाले हत्याकांड प्रकरण लावून धरले. त्यात ठाणेदारांची मवाळ भूमिकाही उघड केली. परिणामी ठाणेदारांची उचलबांगडी झाली आहे. रेती तस्करांवर पुरेशा प्रमाणात वचक ठेवण्यात न आल्याने अमित बटाऊवाले हत्याकांड घडले. रेती तस्करीवरून हे संपूर्ण प्रकरण घडले असताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी विलंब केला. परिणामी आरोपींना एकप्रकारे मुभाच मिळाली. या पार्श्वभूमिवर झालेल्या ठाणेदारांच्या बदल्या बऱ्याच बोलक्या आहेत.
सिनेस्टाईल अटक की आत्मसमर्पण?
अमित बटाऊवाले हत्याकांडातील दोन आरोपी नगरसेवक मो.शाकीर हुसैन व त्याचा भाऊ मो. आबिद हुसैन यांच्या अटकेबाबत जुळ्यानगरीत विविध विरोधाभासी चर्चा सुरू होत्या. पोलिसांनी आरोपींना सिनेस्टाईल अटक केल्याची चर्चा रंगली असतानाच उपरोक्त दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची चर्चाही ऐकू येत होती. पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही आरोपी विनासुरक्षा फिरत असल्याच्या व्हिडीओ क्लिप्स भ्रमणध्वनीवरून फिरत असल्याने आरोपींना नेमकी अटक कशी झाली, याबाबत चर्चांना ऊत आला होता.
पोलीस निरीक्षकांच्या 'रुटिंन' बदल्या करण्यात आल्या आहेत. अचलपूर येथील ठाणेदारांची बदलीही त्याचा एक भाग आहे. त्या ठिकाणचे कार्य चांगले वाटले नाहीत म्हणून त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसे पॉवर एसपींकडे आहेत.
- लखमी गौतम, जिल्हा पोलीस अधीक्षक,
तपास अधिकाऱ्यांची ईदगाहकडे गस्त सुरू असताना माहिती मिळाली की, आरोपी मो. शाकीर व आबीद हुसैन निजामपूर रस्त्याने रणबाबाकडे जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली.
- बी.डी.पौनीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी
अमित बटाऊवाले हत्याकांडातील दोन आरोपी मो. शाकीर व आबिद हुसैन हे निजामपूर रस्त्याने दुचाकीने जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना सिनेस्टाईल अटक केली. त्यांनी पोेलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पकडण्यात यश आले.
- अजय आखरे, पीएसआय (तपास अधिकारी)

Web Title: Achalpur, Sarsampura Thanedar's picking pimp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.