अचलपूर संतोष ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST2021-05-11T04:13:46+5:302021-05-11T04:13:46+5:30

अचलपूर संतोष ठाकर .... मागील एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे लाॅडाऊन सुरू आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या ...

Achalpur Santosh Thackeray | अचलपूर संतोष ठाकर

अचलपूर संतोष ठाकर

अचलपूर संतोष ठाकर

.... मागील एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे लाॅडाऊन सुरू आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण झाले आहे. आणि आता पुन्हा कडक लॉकडाऊन जिल्ह्यात लागलेला आहे. त्यामुळे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्मसपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जी.आर. शेख यांच्या संकल्पनेतून सर्मासपुरा पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने पैसा गोळा करून जीवनाश्यक असणाऱ्या साहित्याचे किट यामध्ये साखर, खाद्यतेल, तूर डाळ, चहा पाकीट, तिखट पाकीट, हळद, मीठ, खोबरेल तेल, बॉटल, साबण खरेदी करून सर्मासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील एकूण शंभर गरिबांना या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

Web Title: Achalpur Santosh Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.