शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्ह्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 6:00 AM

अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक स्टॅलीन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उभयतांच्या प्रकृतीची काळजी वाढली असल्याचा संदेशही शासनदरबारी कळविला होता.

ठळक मुद्देबच्चू कडू । प्रशासकीय प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण, प्रस्ताव पहिल्या पाचमध्ये

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर जिल्ह्याची मागणी सन १९८० पासून असली तरी आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनातूनच अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव प्रशासकीय स्तरावरून शासनदरबारी दाखल झाला. अचलपूर जिल्हा निर्मितीच्या या प्रस्तावाने प्रशासकीय स्तरावरील सर्व टप्पे पूर्ण केले असून, अचलपूर जिल्हा निर्मितीच्या पंगतीत शासनदरबारी पहिल्या पाचमध्ये पोहोचलेला आहे.अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा पोलीस अधीक्षक स्टॅलीन यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उभयतांच्या प्रकृतीची काळजी वाढली असल्याचा संदेशही शासनदरबारी कळविला होता. अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव तयार करून शासनदरबारी पाठविल्याबाबत प्रशासनाने आमदारांना आश्वस्त केले. या अनुषंगाने १८८.४१ कोटींच्या अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी तालुक्यांसह आसेगाव आणि चुरणी या दोन नवे तालुके प्रस्तावित आहेत. सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरली गेली. १८६७ ते १९०५ पर्यंत इंग्रज राजवटीत अचलपूर जिल्हा अस्तित्वात असल्याचे यात स्पष्ट केले गेले.प्रशासकीय दृष्टिकोन व जनहिताच्या सोयी-सवलती लक्षात घेता, अमरावती जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असल्याचा अभिप्रायही प्रशासनाने दिला. भौगोलिक दृष्टिकोनातून अचलपूर हे नवीन जिल्हा मुख्यालयाकरिता योग्य असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. आ. कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे हे फलित ठरले.दिवाळीला आंदोलन, ४१२ दिवस साखळी उपोषणअचलपूर जिल्हा व्हावा, याकरिता आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ रोजी ५०० कार्यकर्त्यांसमवेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. नंतर दुसऱ्या दिवसापासून प्रहारने याच मागणीकरिता ४१२ दिवस साखळी उपोषण केले. यात १५५ गावांतील युवकांनी सहभाग नोंदविला, तर तब्बल १० हजार लोकांनी उपोषण मंडपास भेटी दिल्या होत्या. अचलपूर जिल्ह्याच्या मागणीकरिता ते एकमेव असे पहिले रचनात्मक आंदोलन ठरले. या आंदोलनाची दखल तत्कालीन सरकारनेही घेतली होती. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बच्चू कडूंसह प्रहारच्या शिष्टमंडळासोबत अचलपूर जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने चर्चा केली होती.सात वेळा सकारात्मक चर्चाप्रशासनाकडून शासनदरबारी सादर अचलपूर जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावाचा आमदार बच्चू कडू यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला. मुख्यमंत्र्यांशी या अनुषंगाने बच्चू कडू यांची सात वेळा सकारात्मक चर्चा झाली. राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचे धोरण राबविताना अचलपूरचा निर्णय घेतला जाण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांना आश्वस्त केले आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू