अचलपुरात मुलानेच केला आईवर अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:29+5:302021-03-20T04:13:29+5:30
अचलपूर (अमरावती) : मद्यधुंद मुलानेच आईवर अत्याचार केल्याची घटना अचलपूर शहरातील जीवनपुरा येथे गुरुवारी दुपारी घडली. मायलेकाच्या पवित्र ...

अचलपुरात मुलानेच केला आईवर अतिप्रसंग
अचलपूर (अमरावती) : मद्यधुंद मुलानेच आईवर अत्याचार केल्याची घटना अचलपूर शहरातील जीवनपुरा येथे गुरुवारी दुपारी घडली. मायलेकाच्या पवित्र नात्याला कलंक लावण्याचे काम या नराधम मुलाने केले. या घटनेमुळे अचलपूर शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
दारूच्या नशेत मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत पाहून आईवरच अत्याचार करणाऱ्या आशिष (बदललेले नाव) ला अचलपूर पोलिसांनी गावातूनच अटक केली. जीवनपुरा भागात पीडिता ही स्वयंपाकघरात दुपारी १२ च्या दरम्यान काम करीत असताना दारूच्या नशेत बेधुंद आरोपी मुलगा तेथे आला. मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत पाहिल्यानंतर त्या २६ वर्षीय नराधमाने स्वत:च्या ४५ वर्षीय आईला हॉलमध्ये ओढत नेले आणि तेथे अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी मुलाने पळ काढला. अत्याचार झालेल्या आईने शेजारी आश्रय घेतला. संध्याकाळी पती कामावरून घरी आल्यावर दोघांनी रात्री १० च्या सुमारास पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला अटक केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सेवानंद वानखडे करीत आहेत.