शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अचलपूर बनले शिक्षणाचे माहेरघर, १२०० कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:21 IST

जिल्हा परिषद शाळांचा कायापालट, बच्चू कडू यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पलटून कायापालट करण्याचा निर्णय घेतला. सोबतच या शाळांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निश्चय करीत त्यांनी सरकारकडून तब्बल १२०० कोटींचा निधी खेचून आणत अचलपूर, चांदूर बाजार या दोन्ही तालुक्यांतील शाळांचा कायापालट करण्यात यश मिळविले. परिणामी रूपडे पालटलेल्या शाळेत अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने साहजिकच या शाळांमधील पटसंख्यादेखील वाढली आहे. याचे संपूर्ण श्रेय बच्चू कडू यांना जात असून, शिक्षणाबद्दल त्यांनी दाखविलेल्या आस्थेबद्दल पालकांनी त्यांचे आभार मानले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा शहरातील इंग्रजी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करण्याचा ध्यास बच्चू कडू यांनी घेतला. त्यानुसार तालुक्यातील शाळेच्या इमारतींसोबत त्या शाळामध्ये इंटरनेट, कॉम्पुटर, टॅबसह स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुरविण्यात आली असल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढला आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी शाळेच्या शैक्षणिक वातावरणाप्रमाणे शिक्षण मिळावे, याकरिता आ. बच्चू कडू यांनी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. अचलपूर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, ज्याला सध्या 'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून ओळखले जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मतदारसंघातील सरकारी शाळांचा (जिल्हा परिषद शाळा) होत असलेला कायापालट या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत. 

बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे, याकरिता अनेक शाळांना कॉम्प्युटर, टॅब, इंटरनेट सेवा, विज्ञान प्रयोगशाळा, अन्य आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळत आहे. बच्चू कडू यांचे शिक्षण क्षेत्रातले योगदान फक्त शाळांच्या विकासापर्यंतच मर्यादित नाही. त्यांनी 'सर्वांसाठी शिक्षण' हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यासाठी त्यांनी समाजातील दुर्बल आणि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. 

अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात शैक्षणिक क्रांती आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे अचलपूर मतदारसंघातील शाळांचा इमारती, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी १२०० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट झाला आहे आणि या बदलामुळे अचलपूरला 'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या शैक्षणिक क्रांतीमुळे विद्याथ्यर्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे आणि ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास वाढत आहे.

मराठी शाळांसह उर्दू शाळांचा केला विकास बेलोरा - ४७.५० लक्ष, शिरजगांव कसबा ६४.६५ लक्ष, घाटलाडकी ५१.२५, तळेगाव मोहना १०३ लक्ष, विश्रोली १०९. ७५, कारंजा बहिरम ९५.२०, तोंडगाव १५५ लक्ष, शिरजगाव कसबा उर्दू शाळा- १४५. ०८ लक्ष, ब्राम्हणवाडा थडी उर्दू शाळा- ११७ लक्ष, शिरजगाव बंड येथील उर्दू शाळा- ८७.३० लक्ष, देऊरवाडा येथील उर्दू शाळा- ९७.५० लक्ष, राजना पूर्णा येथील उर्दू शाळा- ५९.६० लक्ष व अचलपूर तालुक्यातील हरम येथील शाळेकरिता ८५.९८ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. परिणामी या शाळांचे रूप पालटल्याचे दिसून येते.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीachalpur-acअचलपूर