अचलपूर बाजार समितीची निवडणूक न्यायालयात
By Admin | Updated: June 22, 2015 00:05 IST2015-06-22T00:05:44+5:302015-06-22T00:05:44+5:30
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय ...

अचलपूर बाजार समितीची निवडणूक न्यायालयात
१३ नामांकन रद्द : हेतुपुरस्सर अपात्र ठरविल्याचा आरोप
नरेंद्र जावरे अचलपूर
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान अर्जांमध्ये त्रुटी काढून तब्बल १३ नामांकन रद्द केले. त्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे. पात्र उमेदवारांना हेतुपुरस्सर अपात्र ठरवून अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याचा आरोप केला जात असून हे प्रकरण आता न्यायालयात गेले आहे.
कृषक कोण? यावरच वाद
कुलदीप काळपांडे यांनी पाच वर्षांपूर्वी याच निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी शेतकरी नसल्याच्या कारणावरून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला होता. परंतु कृषक असल्याचे सिध्द केल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आणि त्यांनी निवडणूक लढविली. आता पुन्हा याच कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. निवडणूक अधिकारी हेतुपुरस्सरपणे हा प्रकार करीत असल्याचा आरोप करीत काळपांडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.