मंगळसूत्र तोडणारा आरोपीला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:33+5:302021-06-29T04:10:33+5:30
अमरावती : महिलेचे मंगळसूत्र तोडून पसार झाल्याची घटना ललित कॉलनीत घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने तपास करून रविवारी आरोपीला ...

मंगळसूत्र तोडणारा आरोपीला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती : महिलेचे मंगळसूत्र तोडून पसार झाल्याची घटना ललित कॉलनीत घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने तपास करून रविवारी आरोपीला मंगळसूत्र व दोन दुचाकीसह अटक केली. आश्विन विजय रामटेके (१९, रा. उत्तमनगर फ्रेजरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी उषा मनोहर दर्यापूरकर (६०, रा. श्रीराम अपार्टमेंट ललीत कॉलनी) ही महिला घरी जात असताना आरोपीने ५५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेल्याची घटना २३ जून रोेजी रात्री घडली. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी घटनेचा तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकी व मंगळसूत्र असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने आणखी एका गुन्ह्यात दुचाकी चोरल्याची कबुुली दिली. याप्रकरणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. सायबर पोलिसांचीही मदत घेण्यात आली.