शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

रेड्डी याला आरोपी करा; अटकेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

आत्महत्या प्रकरणात रेड्डी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी  भाजपने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन केले. मात्र, वनविभाग व शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे रेड्डी यांना अभय मिळत आहे. सुसाईड नोटमध्येदेखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर बदलीची आणि निलंबनाची कारवाई का? त्यांना सहआरोपी का करण्यात आले नाही,  असा सवाल भाजपने केला आहे.

ठळक मुद्देभाजपचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे साकडे, उच्चस्तरीय तपास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला विनोद शिवकुमार याला पाठीशी घालणारे  मुख्य वनसरंक्षक एम.एस. रेड्डी यांना सहआरोपी करून, त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भाजपने गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्याकडे निवेदनातून केली आहे. आत्महत्या प्रकरणात रेड्डी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी  भाजपने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन केले. मात्र, वनविभाग व शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे रेड्डी यांना अभय मिळत आहे. सुसाईड नोटमध्येदेखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर बदलीची आणि निलंबनाची कारवाई का? त्यांना सहआरोपी का करण्यात आले नाही,  असा सवाल भाजपने केला आहे. निवेदन देतेवेळी माजी मंत्री सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रवक्ता शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.  

शिवकुमारला व्हीआयपी सुविधाअटकेतील आरोपी विनोद शिवकुमार याला व्हीआयपी सुविधा मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. आणि अपर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेदेखील सर्वत्र सांगितले जात आहे. त्यामुळे दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा निष्पक्ष, उच्चस्तरीय तपास व्हावा, अशी मागणी भाजपाने आयजींकडे केली.

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग