रेड्डी याला आरोपी करा; अटकेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:48+5:30

आत्महत्या प्रकरणात रेड्डी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी  भाजपने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन केले. मात्र, वनविभाग व शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे रेड्डी यांना अभय मिळत आहे. सुसाईड नोटमध्येदेखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर बदलीची आणि निलंबनाची कारवाई का? त्यांना सहआरोपी का करण्यात आले नाही,  असा सवाल भाजपने केला आहे.

Accuse Reddy; Demand for arrest | रेड्डी याला आरोपी करा; अटकेची मागणी

रेड्डी याला आरोपी करा; अटकेची मागणी

ठळक मुद्देभाजपचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे साकडे, उच्चस्तरीय तपास

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला विनोद शिवकुमार याला पाठीशी घालणारे  मुख्य वनसरंक्षक एम.एस. रेड्डी यांना सहआरोपी करून, त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भाजपने गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 
आत्महत्या प्रकरणात रेड्डी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी  भाजपने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निदर्शने व आंदोलन केले. मात्र, वनविभाग व शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे रेड्डी यांना अभय मिळत आहे. सुसाईड नोटमध्येदेखील रेड्डी काहीच कारवाई करत नव्हते, असे दीपाली चव्हाण यांनी लिहिले आहे. मग रेड्डीवर थातूरमातूर बदलीची आणि निलंबनाची कारवाई का? त्यांना सहआरोपी का करण्यात आले नाही,  असा सवाल भाजपने केला आहे. निवेदन देतेवेळी माजी मंत्री सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रवक्ता शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.  

शिवकुमारला व्हीआयपी सुविधा
अटकेतील आरोपी विनोद शिवकुमार याला व्हीआयपी सुविधा मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. आणि अपर मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध असल्याचेदेखील सर्वत्र सांगितले जात आहे. त्यामुळे दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा निष्पक्ष, उच्चस्तरीय तपास व्हावा, अशी मागणी भाजपाने आयजींकडे केली.

 

Web Title: Accuse Reddy; Demand for arrest