शिंगणापूर येथे अपघात, दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST2020-12-06T04:12:09+5:302020-12-06T04:12:09+5:30

दर्यापूर : खोलापूरहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अज्ञात चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. यात मनीष राजाराम बेलसरे (३५, रा. सलोना, ...

Accident at Shinganapur, two-wheeler killed | शिंगणापूर येथे अपघात, दुचाकीस्वार ठार

शिंगणापूर येथे अपघात, दुचाकीस्वार ठार

दर्यापूर : खोलापूरहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अज्ञात चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. यात मनीष राजाराम बेलसरे (३५, रा. सलोना, ता. चिखलदरा) यांचा मृत्यू झाला. ३ डिसेंबर रोजी दुपारी शिंगणापूर येथे हा अपघात घडला.

पोलीस सूत्रांनुसार, मनीष बेलसरे व राजेश भुसुम (३०, रा. अंबापाटी, ता. चिखलदरा) हे दोघे एमएच २७ क्यू ८७१२ या दुचाकीने किराणा घेऊन जात असताना पूर्णा नदीच्या पुलासमोर वळणावर मागून येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात चालक राजेश व मनीष दुचाकीसह कोसळले. यात मनीष बेलसरे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३०४ अ व मोवाकाच्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

----------------

Web Title: Accident at Shinganapur, two-wheeler killed