म्हैसांग ते रामगाव रस्त्यावर अपघात, एक मृत्यू ; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:47 IST2019-03-20T22:47:07+5:302019-03-20T22:47:21+5:30
शहरातील बाभळी येथील रहिवासी कुटुंब कासरवाडी येथून दर्यापूरकडे येत असताना चालकाच्या सोबत बसलेला मुलाला झोप लागल्याचे निमित्त ठरले आणि चालकाचे नियंत्रण सुटून चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला उलटून पाण्याच्या कालव्यात पडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

म्हैसांग ते रामगाव रस्त्यावर अपघात, एक मृत्यू ; दोन गंभीर
दर्यापूर : शहरातील बाभळी येथील रहिवासी कुटुंब कासरवाडी येथून दर्यापूरकडे येत असताना चालकाच्या सोबत बसलेला मुलाला झोप लागल्याचे निमित्त ठरले आणि चालकाचे नियंत्रण सुटून चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला उलटून पाण्याच्या कालव्यात पडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
मृताचे नाव फिरोज खान शाहरुख खान (३३, रा. बाभळी) आहे. गंभीर जखमींमध्ये जोहा अहमद खान (१२), कमनिसा शेख मुस्तफा यांचा समावेश आहे. बाभळी येथील एकाच कुटुंबातील सात जण अकोला ते देवगाव मार्गाने परतीच्या प्रवासाला होते. पाच किरकोळ जखमी झाले असून, सदर जखमींना दर्यापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेतील जखमी दर्यापूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शहादतखाँ पठाण यांच्या कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. दर्यापूर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.