नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात; जोडपे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 11:27 AM2019-10-28T11:27:03+5:302019-10-28T11:27:25+5:30

रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातातून पती व पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

Accident on Nagpur-Amravati highway; The couple survived | नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात; जोडपे बचावले

नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात; जोडपे बचावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातातून पती व पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
नागपूरहून अमरावतीकडे दिवाळीसाठी जात असलेले नितीन व वृषाली कतरुजवार हे दांपत्य आपल्या कारने ओरिएंटल टोलनाक्याजवळ असताना त्यांच्या गाडीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी जवळच्या नाल्यात जाऊन आदळली व नंतर बाजूच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात कतरुजवार दांपत्य गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताचा आवाज ऐकून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली व या दोघांनाही अमरावतीला उपचारासाठी पाठवण्यात आले. ज्या ठिकाणी त्यांची कार जाऊन पडली त्याच्या बाजूलाच एक मोठी विहीर आहे. ही गाडी त्या विहीरीत गेली असती तर या दोघांनाही वाचवणे अवघड झाले असते असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते.

Web Title: Accident on Nagpur-Amravati highway; The couple survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात