शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकाचा खून; अमरावतीत नेमकं काय घडलं?

By गणेश वासनिक | Updated: September 23, 2022 10:43 IST

चाकूच्या धाकावर मुलीला पळविले

अमरावती : चांदूर रेल्वे येथे २१ सप्टेंबर रोजी एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे चांदूर रेल्वे शहर हादरून गेले होते. पोलीस यंत्रणा चौकशीसाठी दिवस-रात्र कामाला लागली होती. मात्र, २२ सप्टेंबर मध्यरात्री अपहरण केलेल्या शेख नईम यांनी मुलीला तिच्या घरी सोडून दिले. तथापि त्यानंतर परिसरात अज्ञातांकडून शेख नवीन यांचा खून करण्यात आला, अशी धक्कादायक घटना मध्यरात्री चांदूर रेल्वे येथे घडली.

नेमकं काय घडलं?

चाकूच्या धाकावर घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण बुधवारी झाले होते. या प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली तरी त्यांना अटक झाली नाही. त्याच्या निषेधार्थ व आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यापुढे गुरुवारी सकाळपासून हजारोंच्या जमावाने ठिय्या दिला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास अपहरणाची घटना घडली होती. आरोपी नईम खान, शेख अशफाक, अतुल कुसराम व चांदूरवाडी येथील एका जणाने कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवीत मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात कोंबले व पलायन केले. पीडित व आरोपीच्या शोधार्थ ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पथक रवाना झाले होते. अपहृत मुलीच्या कुटुंबीयांसह गारुडीपुऱ्यातील आबालवृद्धांनी गुरुवारी सकाळपासून पोलीस ठाण्यापुढे आरोपींना अटक करा, अशी मागणी करीत ठिय्या दिला. नारेबाजी करण्यात आली. यामुळे आरसीपीचा ताफा मागविण्यात आला.

दरम्यान, अपहरण करणाऱ्या चौघांपैकी अतुल कुसराम याला अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी गारुडीपुऱ्यातील महिला व पुरुषांना याबाबत माहिती दिली व आरोपींना लवकरात लवकर अटक करू, असे आश्वासन दिले. यानंतर नागरिकांना रवाना करण्यात आले. पोलीस यंत्रणा चौकशीसाठी दिवस-रात्र कामाला लागली होती. मात्र, २२ सप्टेंबर मध्यरात्री अपहरण केलेल्या शेख नईम यांनी मुलीला तिच्या घरी सोडून दिले. त्यानंतर परिसरात अज्ञातांकडून शेख नवीन याची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणDeathमृत्यूAmravatiअमरावती