अल्पवयीन मुलीचे अपहरण पत्नीची तक्रार, पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:01 IST2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:01:03+5:30
चपराशीपुरा येथील रहिवासी अमरीन सदफ ऊर्फ निदा अंजुम यांच्याशी आरोपी शेख फैय्याजचे लग्न झाले. त्यानंतर तो सासरीच राहत होता. ४ डिसेंबर २०१७ रोजी शेख फैय्याजने सासरवाडीतून पत्नी अमरीन सदफ यांच्या बहिणीच्या लग्नासाठी असलेली रोख व सोन्याचे दागिने लंपास केले.

अल्पवयीन मुलीचे अपहरण पत्नीची तक्रार, पतीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सासरवाडीत चोरी करून परिसरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपी पतीला फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. शेख फैय्याज ऊर्फ अयान शेख कमाल (३० रा.अकोट फैल, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. त्याने चोरलेली रोख व सोने असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्तीसाठी पोलीस प्रयत्नरत आहेत. गत १९ मे रोजी आरोपीच्या पत्नीने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली होती.
चपराशीपुरा येथील रहिवासी अमरीन सदफ ऊर्फ निदा अंजुम यांच्याशी आरोपी शेख फैय्याजचे लग्न झाले. त्यानंतर तो सासरीच राहत होता. ४ डिसेंबर २०१७ रोजी शेख फैय्याजने सासरवाडीतून पत्नी अमरीन सदफ यांच्या बहिणीच्या लग्नासाठी असलेली रोख व सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान त्याने बिच्छू टेकडी परिसरातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून पलायन केले. पती परत येईल, या आशेने पत्नीने पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती. अनेक दिवस तिने पतीच्या येण्याची प्रतीक्षा केली. मात्र, तो परतला नाही. दरम्यान एक दिवस पती शेख फैय्याज हा एका अल्पवयीन मुलीसोबत पत्नीला दिसला. त्याने तिला पळविल्याची माहिती पत्नीला मिळाली. त्यामुळे अमरीन यांनी १९ मे २०१९ रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता. फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात डीबीचे खंडारे यांच्या पथकासह एएसआय सुरेंद्र ढोके यांनी शेख फैय्याजला सोमवारी दुपारच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.