अमरावती जिल्ह्यातल्या आरुषी धर्माळे हिची इस्रो सहलीसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 19:21 IST2022-01-08T19:19:39+5:302022-01-08T19:21:01+5:30
Amravati News इस्रो सहलीसाठी निवडण्यात आलेल्या ५४ विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातून अंजनगाव सुर्जी येथील आरुषी कपिल धर्माळे हिचा समावेश झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या आरुषी धर्माळे हिची इस्रो सहलीसाठी निवड
ठळक मुद्दे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात मुलींमधून प्रथमजिल्ह्यातील एकमेव विद्यार्थिनी
अमरावती : इस्रो सहलीसाठी निवडण्यात आलेल्या ५४ विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातून अंजनगाव सुर्जी येथील आरुषी कपिल धर्माळे हिचा समावेश झाला आहे. ती सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलची सहावीची विद्यार्थिनी आहे.
आरुषीची जवाहर नवोदय विद्यालयाकरितादेखील निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. तिचे आईवडील अकोट येथे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासह शिक्षकांना तिने यशाचे श्रेय दिले आहे.