प्रकटदिनी खापर्डे वाड्यात ‘श्रीं’ची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST2021-03-06T04:13:09+5:302021-03-06T04:13:09+5:30

अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात प्रकटदिनी शुक्रवारी सकाळी मोजक्या भाविकांनी संत गजानन ...

Aarti of 'Shree' at Khaparde Wadi on the day of revelation | प्रकटदिनी खापर्डे वाड्यात ‘श्रीं’ची आरती

प्रकटदिनी खापर्डे वाड्यात ‘श्रीं’ची आरती

अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्यात प्रकटदिनी शुक्रवारी सकाळी मोजक्या भाविकांनी संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व पूजाअर्चना केली.

श्रीमंत दादासाहेब खापर्डे हयात असताना शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांनी वाड्याला भेट देऊन येथे काही काळ विश्रांती घेतली होती. या ठिकाणी एक विहीर व नजीक एक ओटा आहे. तेथील विहीरीजवळ औंदुबराचे वृक्ष होते. तेथे संत गजानन महाराज बसले होते. खापर्डे वाड्याला श्री संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्श लाभला. मात्र, काही वर्षांपूर्वी व्यक्तीने औदुंबर वृक्ष तोडले. तथापि, भाविक श्रद्धेपोटी या ठिकाणी एकत्र येऊन पूजा व आरती करतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे मोजक्याच भाविकांंचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

Web Title: Aarti of 'Shree' at Khaparde Wadi on the day of revelation