बालपणीच्या मित्रानेच घातला तरुणीला ९६ लाखांचा गंडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:32 IST2025-01-17T11:29:34+5:302025-01-17T11:32:27+5:30
Amravati : आर्किटेक्चर तरुणीची तक्रार, अखेर गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल, कंपनीत अपहार

A young woman was duped of Rs 96 lakh by her childhood friend!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चाइल्डहुड फ्रेंडने आपली ९६ लाख ९ हजार १७९ रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार एका आर्किटेक्चर व उद्योजक तरुणीने नोंदविली आहे. त्याआधारे गाडगेनगर पोलिसांनी १५ जानेवारी रोजी भूषण मारोती महल्ले, श्रीमंगल कॉलनी, अमरावती) विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंदविला.
तरुणीला फॅशन डिझायनिंगची आवड असल्याने तिने व्यवसायात पाऊल टाकले. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने तरुणीसमोर शिपिंगची समस्या उद्भवली. भूषणनेच तरुणीला पुणे येथे येण्याची ऑफर दिली. ट्रान्स्पोर्टेशनची अडचण येणार नाही, अशी बतावणी त्याने केली. सबब, ती भावासोबत ऑगस्ट २०२१ मध्ये पुणे गेली.
वेबसाइट नको, कंपनी काढ
आरोपीने तरुणीला तिचा भाऊ आणि ती, असे दोन संचालक घेऊन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करण्याची सूचना केली. त्याने कंपनीदेखील नोंदणीबद्ध केली; परंतु काही दिवसांनी आपल्या भावाऐवजी आरोपी हा स्वतःच त्या कंपनीचा डायरेक्टर होऊन त्याने ५० टक्के शेअर स्वतःच्या नावे घेऊन नोंदणी केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.
२७ मे २०२४ रोजी केली होती आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार
२५ लाख : कंपनीच्या नावे आरोपीने २५ लाख रुपये कर्ज काढले. वैयक्तिक खर्चासाठी वापरले. तिच्या एटीएम कार्डचा गैरवापर. त्याने त्याच्या बहीण व जावयासाठी तरुणीच्या पैशांचा वापर केला. अमरावतीहून सोने खरेदी केले. आरोपीने तरुणीच्या बँक खात्यातून ७७,४७,६८६ रुपये काढले तथा कर्ज खात्यातून १०.७२ लाखांचा अपहार.