शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मनी लॉड्रिंगचा अकल्पित गुन्हा सांगून शिक्षकाला केले 'डिजिटल अरेस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:12 IST

बागुलबुवा, पाच लाख रुपये उकळले : २५ दिवसांनंतर तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मनी लाँड्रिंगचा बागुलबुवा उभा करून ४५ वर्षीय शिक्षकाला 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तुम्हाला व कुटुंबीयांना खरोखरीच अटक करू, अशी भीती दाखवण्यात आली. या अकल्पित गुन्ह्यातून सुटण्यासाठी शिक्षकाला पाच लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास बाध्य करण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांत तब्बल महिनाअखेरीस गुन्हा नोंदविला गेला.

स्थानिक रहमतनगर येथील ४५ वर्षीय शिक्षकाला ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास एक व्हिडिओ कॉल आला. पलीकडून राजकुमार व हेमराज कोळी बोलत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ९८०१२९४८९५ या क्रमांकाहून आलेल्या कॉलवरून त्या व्यक्तींनी आपण टेलिकॉम व क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवले. बँक खात्याच्या तपशिलानुसार आपण मनी लाँड्रिंग केली आहे. त्यात आरोपी म्हणून नाव आले असून तोतया क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने त्या शिक्षकाला अटकेची व गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली. दोन ते तीन तास फोनवरूनच हा प्रकार चालला. शिक्षक पूर्णपणे कह्यात आल्याचे लक्षात येताच गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी सायबर भामट्याने पैशांची मागणी केली. ती रक्कम बंधन बँकेतील मल्टिप्लाय इंटरप्राइजेस फिशिंग बिजनेस या दोन बँक खात्यामध्ये पाठविण्यास प्रवृत्त केले. त्यातून आरोपींनी आपली ४ लाख ९९ हजार ९७१ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचे त्या शिक्षकाने सायबर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले. 

"फसवणुकीच्या या प्रकारात घोटाळेबाज ईडी, सीबीआय, पोलिस किंवा आरबीआयचे अधिकारी असल्याचे भासवतात. मग सर्वसामान्यांना त्यांना ज्ञात नसलेल्या खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देतात. अशा प्रकाराला बळी पडू नका. कोणत्याही अज्ञात स्रोताकडून येणाऱ्या लिंकवर क्लिक करणे टाळा, कोणत्याही अनोळखी फोन कॉलवर तुमचे वैयक्तिक किंवा बँक तपशील देण्याची चूक करू नका."- नविनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

टॅग्स :digitalडिजिटलArrestअटकMONEYपैसाAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी