पोलिसांच्या वाहनाला रेती टिप्परने ठोकरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:45 IST2022-11-18T23:44:26+5:302022-11-18T23:45:33+5:30
पोलिस सूत्रांनुसार, अमोल वासुदेव इंगळे (३०, रा. ब्राह्मणवाडा थडी) असे मृताचे नाव आहे. ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पेठे, कॉन्स्टेबल अनूप मानकर यांनी आरोपी विजय दीपक वानखडे ऊर्फ लल्ला (२५, रा. बुंदेलपुरा, अचलपूर) याला जेरबंद करण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले होते. तो नागपुरात असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली होती.

पोलिसांच्या वाहनाला रेती टिप्परने ठोकरले
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणवाडा थडी/मोर्शी : आरोपीला नागपूरहून अटक करून आणण्यासाठी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी भाड्याने घेतलेल्या खासगी वाहनाला अपघात होऊन चालकाचा मित्र ठार झाला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर या वाहनाला रेती वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
पोलिस सूत्रांनुसार, अमोल वासुदेव इंगळे (३०, रा. ब्राह्मणवाडा थडी) असे मृताचे नाव आहे. ब्राह्मणवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पेठे, कॉन्स्टेबल अनूप मानकर यांनी आरोपी विजय दीपक वानखडे ऊर्फ लल्ला (२५, रा. बुंदेलपुरा, अचलपूर) याला जेरबंद करण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले होते. तो नागपुरात असल्याची माहिती पोलिस ठाण्याला प्राप्त झाली होती. त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरण, विनयभंग व पॉस्कोचा गुन्हा दाखल होता. भाड्याने घेतलेल्या खासगी वाहनाचा चालक अक्षय ऊर्फ गोलू पोकळे याने त्याचा मित्र अमोल (दोघेही रा. ब्राह्मणवाडा थडी) यालाही सोबत घेतले होते. आरोपीला नागपुरातून ताब्यात घेऊन रात्री परत येत असताना गुरुवारी रात्री १ च्या सुमारास हिवरखेड ते मोर्शीदरम्यान रेती वाहून नेणाऱ्या दहाचाकी ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात वाहन चकनाचूर झाले. या धडकेत अमोलचा जागीच मृत्यू झाला. चालक अक्षय व आरोपी विजय हे अपघातातून बचावले, तर मंगेश पेठे व अनूप मानकर यांना किरकोळ मार लागला.