शहर रास्ता भाव संघटनेद्वारा ‘एक हात मदतीचा’
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 12, 2024 19:43 IST2024-04-12T19:43:11+5:302024-04-12T19:43:22+5:30
वादळ, अवकाळीने विस्थापित २९५ कुटुंबांना मोफत अन्नधान्याची किट

शहर रास्ता भाव संघटनेद्वारा ‘एक हात मदतीचा’
अमरावती: चांदूर बाजार तालुक्यात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाचा फटका बसलेल्या शिरजगाव बंड, इमामपूर, जमापूर गावातील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. यात गावातील २९५ कुटुंबांचे संसार उघड्यावर आले, या कुटुंबांना शहर रास्त भाव संघटनेद्वारा शुक्रवारी अन्नधान्याची मोफत कीट देण्यात आली.
या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानाचा भार कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे, अन्न धान्य वितरण अधिकारी,प्रवीण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती शहर संघटना अमरावती शहर यांचे मार्फत माणुसकीच्या भावनेतून ‘एक हात मदतीचा’ या उद्देशाने ‘अन्न धान्य किट’ चे मोफत वितरण प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन तहसील कर्मचारी व संघटनेचे प्रतिनिधी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी शितल आंबटकर, पुरवठा निरीक्षक चांदूरबाजार व संघटनेचे प्रतिनिधी अजय अग्रवाल, शैलेश मिसे, सीजी केशरवाणी, अमोल कोल्हे, मुन्ना दुलारे, सचिन पाटील, संदीप तायवाडे,चैतन देशमुख, दादाराव कलाने, जयप्रकाश फोटाणी, प्रेम आहूजा आदी उपस्थित होते.