शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'शेअर'मध्ये ७४ लाखांना गंडा नऊ जणांची टोळीच पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 14:37 IST

आरोपी आंतरराज्यीय : मोबाइल, चेकबुक, रोकडही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ४० वर्षीय महिलेची शेअर खरेदी विक्री व्यवहारात तब्बल ७४ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी भागातील एका हॉटेलमधून २३ जून रोजी नऊ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोख, मोबाइल व अन्य सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी माध्यमांना दिली. ते आरोपी हरयाणा, आसाम, राजस्थान, उत्तरप्रदेश, जोगेश्वरी पश्चिम मुंबई व नागपूर येथील रहिवासी आहेत. ७४ लाखांपैकी ४० लाख रुपये सायबर पोलिसांनी गोठविले आहेत.

अटक आरोपींमध्ये सुनील हनुमान (३०), विक्रम जिलेसिंग (४१, दोघेही रा. फतेहबाद, हरयाणा), परान अली जमालउद्दीन (१९, जि. कामृप, आसाम), अमन कुमार प्रेमचंद (५०, रा. जि. जयपूर, राजस्थान), मो. मरुफ मो. हमीद (२४), सौरभ बलिंद्रकुमार तिवारी (२३, रा. दोघेही उत्तरप्रदेश), मो. साबिर असुब शेख (१९), फराज खान असिफ खान (१९, दोघेही रा. जोगेश्वरी पश्चिम मुंबई) व विमल मानकलाल काटेकर (३१, रा. नागपूर) यांचा समावेश आहे. अटक आरोपींकडून १८ मोबाइल, २३ डेबिट व क्रेडिट कार्ड, १८ चेकबुक, इंडिगो विमानाचे सहा टिकीट, स्टॅप व २.२८ लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. मूळ फसवणुकीच्या गुन्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्यासह अन्य तीन कलमे देखील वाढविण्यात आली आहेत.

अशी झाली फसवणूकपापळ येथील एका महिलेची शेअर मार्केट संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपवर ७४ लाख १९ हजार रुपयांनी फसवणूक झाली. शेअर ट्रेडिंगकरिता त्यांनी ती रक्कम पाठविली. त्या अॅपवर शेअर खरेदीविक्री करीत होत्या. फिर्यादीला त्यांच्या खात्यात नफा दिसत होता. मात्र रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता विड्रॉल झाला नाही. त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

मुंबईतून व्यवहारसायबर पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल यांनी तांत्रिक विश्लेषण केले असता, भारताबाहेर विविध देशात बसून काही व्यक्तींचा समूह संगनमत करून अशाप्रकारे गुन्हे करण्यास प्रवृत्त करून गुन्ह्याचा कट रचत असल्याचे समोर आले. मुंबईतील अंबोली ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी पूर्व भागातील एका महागड्या हॉटेलमध्ये बसून काही जण भारतभर फसवणूक झालेली रक्कम मुख्य आरोपीपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीshare marketशेअर बाजार