शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शेतकऱ्याला मारहाण करून विष्ठा खाण्यास भाग पाडले; अमरावती जिल्ह्यातील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 16:42 IST

तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.

ठळक मुद्देपहिल्यांदा २६९, २७० कलमान्वये गुन्हा

अमरावती : पूर्व वैमनस्यातून एका ४५ वर्षीय व्यक्तीला चक्क मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडण्यात आले. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे २६ मे रोजी दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी बबन आत्माराम बुरंगे (६०), सुरेश आत्मारामजी बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) व राजेंद्र उर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, नंदकुमार बुरंगे (४५) व आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून जुना वाद होता. दरम्यान, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास नंदकुमार बुरंगे हे शेतातून गावात येत असताना आरोपींची आणि त्यांची नजरानजर झाली. तुझ्या अंगात जास्त येते, तू नेहमी वाईट शब्दात आम्हाला व आमच्या घरातील लोकांना शिवीगाळ करत असतो, असे म्हणून बबन बुरंगेने नंदकुमार यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. याशिवाय भूषण बुरंगे व राजेंद्र ठाकरे यांनीदेखील आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे नंदकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर भूषण बुरंगे याने राजेंद्र ठाकरे याला विष्ठा आणण्यास सांगितले. ती विष्ठा आरोपींनी माझ्या तोंडात कोंबली, ती खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार नंदकुमार बुरंगे यांनी २ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नोंदविली. विशेष म्हणजे, यात कोरोना कलम म्हणून प्रसिद्ध भादंविचे कलम २६९, २७० त्यापश्चात पहिल्यांदाच यात वापरली आहे.

काय आहे कलम २६९, २७० ?

कलम २६९ म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी होणारी निष्काळजीपणाची कामे जी दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आणू शकते आणि कलम २७० म्हणजे एखाद्या रोगाचा प्रसार करण्यासाठी केलेली प्राणघातक किंवा हानिकारक कृती ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात येते. हे दोन्ही कलमे भारतीय दंड संहितेच्या १४ व्या अध्यायांतर्गत आहेत, ज्यात सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा, आनंद, शिष्टाचार आणि नैतिकतेवर परिणाम करणारे गुन्हे समाविष्ट आहेत, तर आयपीसीच्या कलम २६९ अन्वये गुन्हेगारास सहा महिने किंवा दंड किंवा दोन्ही आणि कलम २७० अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

मानवी विष्ठा आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना ताब्यात घेतले.

मिलिंद सरकटे, ठाणेदार, बेनोडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीAmravatiअमरावती