मद्यपीचा घरात शिरून महिलेवर बलात्कार
By प्रदीप भाकरे | Updated: May 2, 2023 17:14 IST2023-05-02T17:14:23+5:302023-05-02T17:14:45+5:30
Amravati News मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मद्यपीचा घरात शिरून महिलेवर बलात्कार
अमरावती : मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसात आरोपी जगदीश उकंडराव मेश्राम (३५, ता. चांदूर रेल्वे) याच्याविरुद्ध बलात्कार, मारहाण, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. १ मे रोजी दुपारी २:१८ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तक्रारीनुसार, महिलेचा पती घरी नसताना आरोपी जगदीश हा तिच्या घरात मद्यधुंद स्थितीत शिरला. त्याने तिच्या मोठ्या मुलाला धमकी देऊन घराबाहेर पाठविले. त्यावर तू माझ्या घरी दारू पिऊन कसा आलास, असा प्रश्न तिने आरोपीला केला. त्यावर आरोपीने तिला काठीने बेदम मारहाण केली. अधिक आरडाओरडा केल्यास मारून टाकण्याची धमकी देत तिला शिवीगाळ केली. पुढे जाऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पती घरी आल्यानंतर पीडित महिलेने त्याच्याजवळ आपबीती कथन केली. दुसऱ्या दिवशी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.