तखतमल महाविद्यालयाचा ९६.७७ टक्के निकाल
By Admin | Updated: May 29, 2015 00:38 IST2015-05-29T00:38:38+5:302015-05-29T00:38:38+5:30
स्थानिक दीपा शिक्षण संस्थेद्वारे संचालित तखतमल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९६.७७ टक्के लागला.

तखतमल महाविद्यालयाचा ९६.७७ टक्के निकाल
अभिलाषा मुंदडा प्रथम : मुलींची बाजी
अमरावती : स्थानिक दीपा शिक्षण संस्थेद्वारे संचालित तखतमल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९६.७७ टक्के लागला. महाविद्यालाची विद्यार्थिनी अभिलाषा विकास मुंदडा हिने ८७.३८ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम स्थान प्राप्त केले.
माहेश्वरी प्रदीप नांदूरकर हिने ८६.६१, प्रियंका जशनलाल वर्मा हिने ८५.५३ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीत क्रमांक प्राप्त केला. यंदाही महाविद्यालयाच्या प्रावीण्य यादीत मुली अव्वल आहेत. एकूण ६२ विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मागील ४ वर्षांपासून महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्क्यांच्या जवळपास लागत आहे.
गुणवान विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नारायणदास जाजोदिया, उपाध्यक्ष सिद्दीकी, लता सिंघई, सचिव रंगनाथ चांडक, सहसचिव निवाणे, कोषाध्यक्ष शारंग चांडक, सदस्य गोपालदास तापडिया, जुगलकिशोर पटेरिया यांनी कौतुक केले आहे.
महाविद्यालयातील अन्य यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रूतिका सुनील रॉय, शशिकला शर्मा, हार्दिक भंडारी, मोहिनी मोरे, शरयू सोनकर, आयुषी सिंघई, नेहा कर्मा, मोहिनी टोल, योगिता निकम, पूजा जसवानी, सिमरन साहू, आकांक्षा र्श्मा, विकास कुमावत, प्रतीक्षा झिंगरे, प्रसाद अनासाने यांचा समावेश आहे.
दरवर्षीच स्थानिक तखतमल कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल उत्कृष्ट लागतो. दिवसेंदिवस महाविद्यालयाची गुणवत्ता वाढत चालली आहे. या महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची ही पंरपरा यंदादेखील कायम राखली आहे. महाविद्यालयातून प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी पालकांसह शिक्षकांना श्रेय दिले आहे. (प्रतिनिधी)